टिळकवाडी अनगोळ भागात शिवमय वातावरण
बेळगाव व परिसरात वातावरण शिवमय
दुर्गामाता दौडी मध्ये पारंपरिक वेशात धावणारे मावळे, अंगात स्फुर्ती जगावणारी गीते यामुळे संपूर्ण बेळगाव व परिसरात वातावरण शिवमय बनले आहे. दौडी मध्ये धावत असलेल्या धारकऱ्यांना पाहून अनेकांमध्ये चेतन्य निर्माण झाले आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीन आज सोमावरी टिळकवाडी, अनगोळ भागात दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात आले होते यात हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी कॉलनी येथे पहाटे 5.45 वाजता मनपा. उपमहापौर आनंद चव्हाण , टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक परशराम पुजारी ,त्यांच्यासोबत माजी सैनिक शिवाजी कंग्राळकर यांच्या हस्ते आरती करून दौडीस प्रारंभ करण्यात आला
दौडीच्या मार्गावर महिलांनी आकर्षक रांगोळ्या कडून स्वागत केले ठिकठिकाणी भव्य स्वागत कमानी उभारण्यात आला होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची वेष भूषा करून दाखल झालेल्या चिमुकल्यानी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
छत्रपती शिवाजी कॉलनी, महर्षी रोड, शुक्रवार पेठ, बलराम युवक मंडळ, मंगळवार पेठ, शिवनेरी युवक मंडळ, सोमवार पेठ, सिंधुदुर्ग सोसायटी, चिदंबर नगर, भाग्यनगर, विद्या नगर,स्वामी विवेकानंद मार्ग, जय अमर शिवाजी युवक मंडळ कुर्बार गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, श्री राम युवक मंडळ राजहंस गल्ली, शिवनेरी युवक मंडळ, रघुनाथ पेठ, जय महाराष्ट्र चौक, हनुमान युवक मंडळ भांदुर गल्ली, बालगणेश युवक मंडळ आझाद चौक, हनमननांवर गल्ली, शिवक्रांती युवक मंडळ नाथ पै नगर, जय शिवराय युवक मंडळ, श्रीराम सेना आदींच्या वतीने दौडीचे स्वागत करण्यात आले.
महालक्ष्मी मंदिर येथे साळुंखे यांच्या हस्ते आरती करून ध्वज उतरवण्यात आला नगरसेवक विनायक गुंजटकर, मोहन भांदुर्गे उपस्थित होते.
उद्या ची दौड
सुरुवात बसवेश्वर सर्कल खासबाग ते श्री मंगाई मंदिर वडगांव येथे सांगता