Share News

बेळगावात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद,आशा कार्यकर्त्या भाग्यनगर परिसरात भटक्या कुत्र्याने केला हल्ला

आतापर्यंत 25 जणांना येथील भटक्या कुत्र्याने घेतला चावा

बेळगाव – बेळगाव शहर मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे गुरुवारी भाग्यनगर येथील 7 क्रॉस परिसरात आशा कार्यकर्त्या आपल्या दैनंदिन कामासाठी आज प्रत्येक वॉर्ड मध्ये जात असतात भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला तसेच आता आतापर्यंत 25 जणांना येथील भटक्या कुत्र्याने चावा घेतला आहे
त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणी वर आला आहे.
याआधीही बेळगाव शहर, उपनगरं आणि ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांनी गाई-बकरी यावरच नव्हे तर शाळेत जाणाऱ्या लहान विद्यार्थ्यांवर आणि मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांवर हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. शहर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच चालली असून या भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून वारंवार केली जात असतानाही जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने नको ती कारणे सांगून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकडे हेतुपुरस्सर कानाडोळा केलेला आहे.

प्राणी दया संघटना मोकाट कुत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याने आम्ही काहीच करू शकत नाही असेही बोलले जाते. असे असेल तर मोकाट कुत्र्यांबद्दल कणव असणाऱ्या भटक्या कुत्र्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होणारे दहशत याबद्दल काही वाटते का नाही? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.


Share News