Share News

शिवाजीराव पाटील यांना हलकर्णी परिसरात महिलांचा मोठा पाठिंबा.

लाडक्या भावाच्या विजयासाठी लाडक्या बहिणींचा निर्धार.

हलकर्णी: अडीअडचणीत मदतीला धावणारे, चुटकीसरशी कामे मार्गी लावणारे, वेळप्रसंगी स्वखर्चातून कामे करून लोकांना दिलासा देणारे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना हलकर्णी परिसरात वाढता पाठिंबा मिळत आहे. महिलांनी घर टू घर फिरून प्रचार करून विजय मिळवण्याचा संकल्प केला आहे. शिवाजीराव पाटील यांनी मतदार मतदारसंघात भेटून लोकांशी संवाद साधून प्रचार सुरू केला आहे .प्रत्येक गावांत शिवाजीराव पाटील यांना महिलांसह सर्व मतदारांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. या प्रचार यंत्रणेमध्ये सामाजिक कार्यकर्ते डॉ गंगाधर व्हसकोटी आपल्या कार्यकर्त्यासह महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. गरीब गरजू लोकांना सढळ हस्ते मदत करणाऱ्या डॉ गंगाधर व्हसकोटी यांनी हलकर्णी जिल्हा परिषद मतदार संघासह चंदगड विधानसभेच्या शेवटच्या टोकापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. कार्यकर्ते, सर्वसामान्य मतदार यांनी शिवाजीराव पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे .डॉ गंगाधर व्हसकोटी गटाचे या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे .डॉ गंगाधर व्हसकोटी आणि त्यांच्या कार्यकर्त्यामुळे शिवाजीराव पाटील यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे.


Share News