Share News

रिमोट चे बटन दाबून केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी  यांच्या रस्ते विकास कामांचा शुभारंभ

राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा कोनशीला उभारणी कार्यक्रमा करिता उपस्थित

बेळगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या रिंग रोडचा समावेश

राज्यातील 376 किलोमीटर लांबीच्या व 6975 कोटी रुपये अनुदानातून करण्यात येणारा #राष्ट्रीयमहामार्गाच्या कामाचा कोनशीला उभारणी कार्यक्रम आज बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला आहे . केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री #नितीनगडकरी यांच्या हस्ते कामाला प्रारंभ करण्यात आला

https://www.facebook.com/share/v/gvMba7R92v6kmVZn/?mibextid=w8EBqM

उत्तर कर्नाटकातील कारवार विजापूर बागलकोट कोपर्ड रायचूर गुलबर्गा बिदर जिल्ह्यातून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे .यात बेळगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या रिंग रोडचा समावेश आहे.

रिंगरोड 1622.04 कोटी खर्चातून 34.48 किलोमीटर करण्यात येणार आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण 121.18 किलोमीटर रस्ते विकासासाठी 4237.12 कोटी निधीतून करण्यात येणार आहे बेळगाव तालुक्यातील होनगा ते झाड शहापूर रिंग रोड रस्ता कामाला प्रारंभ करण्यात आला.#ministernitingadkari


Share News