Share News

केंद्र सरकारच्या नरेगा योजनेतील 75% रक्कम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना द्या

शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

केंद्र सरकारने दिलेली दुष्काळी मदत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पुरेशा प्रमाणात वितरित केली जावी या मागणीकरिता आज कर्नाटक राज्य रयत संघटना यांच्या नेतृत्वाखाली विविध संघाच्या शेतकऱयांनी आंदोलन केले आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.यावेळी शेतकऱ्यांनी या मागणीसह केंद्र सरकारच्या नरेगा योजनेतील 75% रक्कम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी देखील निवेदनाद्वारे केली.

बेळगाव जिल्हयातील सर्व शेतक-यांना समस्त कृषी कृषक समाजाकडून पुरेशी पीक नुकसान भरपाई मिळालेली नाही त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतक-यांना नरेगा योजनेंतर्गत 75% रोजगार उपलब्ध करून दिला जात नाही त्यामुळे नरेगा मध्ये होत असलेल्या बोगस कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली .

यावेळी शेतकरी म्हणाले की 2023 मध्ये दुष्काळ पडला असून शासनाने तो दुष्काळी भाग म्हणून घोषित केला आहे मात्र अजून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात कृषी व महसूल विभागाचे अधिकारी कानाडोळा करत आहेत. त्यामुळे आपल्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली .


Share News