शून्य रिसॉर्ट मध्ये 31 ऑगस्ट ला रंगाणार गायनाची मैफील
बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील शून्य फार्म9 रिट्रीट येथे डॉ. एजी तेंडुलकर यांच्या स्मरणार्थ 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता मेघ मल्हारम शास्त्रीय हिंदुस्थानी संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे शून्य फार्म रिट्रीट रिसॉर्टचे मालक भक्तिवेदा यांनी सांगितले.
बुधवारी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या स्पर्धेत बेळगाव, गोकाक, धारवाड उत्तर कर्नाटकसह शेजारील महाराष्ट्र आणि गोव्यातील हिंदुस्थानी संगीत गायक सहभागी होणार आहेत. संगीत स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. ग्रामीण भागातील कलागुणांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मैफलीचा लाभ बेळगावातील जनतेने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध हिंदी गायक रूपकुमार राठोड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग येणार आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कुशल तज्ज्ञ उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली
त्यानंतर डॉ. यदेंद्र पुजारी म्हणाले की, बेळगावात अनेक शास्त्रीय संगीतकार आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी इम्रान मकानदार , रेमे रामदास आदी उपस्थित होते.