जारकीहोळी ब्रदर्सचा बेळगाव मधून शेट्टर यांना पाठिंबा
भीमशी जारकीहोळी एस सी एसटीची मते मिळविण्यात यशस्वी
दोन्ही नेत्यांमध्ये कुवेम्पू नगर मधील निवासस्थानी बैठक
बेळगाव जिल्हा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी जारकीहोळी यांचे बंधू भीमशी जारकीहोळी यांची बेळगाव येथील कुवेम्पू नगर मध्ये भीमशी जारकीहोळी यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे यावेळी भीमशी जारकीहोळी यांनी जगदीश शेट्टर यांचे शाल देऊन स्वागत केले.
दोन्ही नेत्यांमध्ये कुवेम्पू नगर मधील निवासस्थानी बैठक पार पडली.या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. भीमशी जारकीहोळी हे एस एस टी मतदारांची मते मिळवण्यात यशस्वी आहेत.तर रमेश जारकीहोळी यांचा देखील भाजपला मोठा पाठिंबा आहे. आता भीमशी जारकीहोळी रमेश जारकीहोळी हे दोघेही बंधू मिळून बेळगाव मधून शेट्टर यांना पाठिंबा देत आहेत.
त्यामुळे आता काँग्रेसला चांगलाच फटका बसणार असण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. एकीकडे भाजप पक्षात रमेश सारखी होळी आहे तसेच त्यांना आता भीमची जर्किंग यांचा पाठिंबा मिळत आहे तर विरुद्ध पक्षात काँग्रेस पक्षाचे सतीश जारकीहोळी आहेत. सतीश जारके होळी यांचे सुद्धा फॅन्स फॉलोईंग मोठ्या प्रमाणात आहे.
त्यामुळे आता दोन बंधू एकत्र येऊन भाजप पक्षाला विजयी करून देणार,का? सतीश जारकीहोळी हे या दोघांवर भारी पडणार नाही हे आता पहावे लागणार आहे.