Share News

वार्ड नं.२१ श्रींगारी कॉलनी मध्ये डेंगू प्रतिबंधक लसीकरण मोहिम.

बेळगाव :
पावसाळ्यात डासांची झपाट्याने वाढ होत असल्याने सगळीकडे डेंग्यु आणि चिकणगुणिया झालेले अनेक रुग्ण पहावयास मिळत आहेत त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी बेळगांव दक्षिणचे आमदार.अभय पाटील यांच्या विशेष पुढाकाराने आणि मार्गर्शनाखाली,वार्ड नं.२१ च्या नगरसेविका सौ प्रिती कामकर यांनी आपल्या वार्डामध्ये गेल्या काही दिवसांपासू डेंगू रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवित आहेत.

आज वॉर्ड क्रमांक २१श्रींगारीकॉलनी, बाडीवाले कॉलनी, टीचर्स कॉलनी, पाटील गल्ली, कुंती नगर,येथे
डेंग्यू आणि चिकनगुनिया लस घरो घरी जाऊन देण्यात आले. यावेळी समाजसेवक विनायक कामकर हे घरोघरी जाऊन व सर्व कार्यकर्ते मिळून घरोघरी जाऊन डेंग्यू व चिकनगुनिया याची औषध दिले. यावेळी गणपती वडेर, सूर्यकांत हिंडलगेकर, संतोष श्रींगारी, शंकर कांबळे आर एम हेरेकर , प्रकाश शहापूरकर,बाळू मिराशी,राजू तपास्कर, सौरभ घोरपडे निकिता बोमनवर, श्री खंनुरकर,संदीप रायकर, रविकुमार कम्मार श्री दळवी या सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

*वरील कॉलनीतील नागरिकना गुरुकृपा* *मेडिकल येथे मोफत लस उपलब्ध आसून याचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे*


Share News