Share News

हिडकल जलाशयातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिर पाण्याखाली

पुणे बेंगलोर महामार्गावरील संकेश्वर बेळगाव दरम्यान असलेल्या हिडकल जलाशयातील ऐतिहासिक विठ्ठल देव मंदिर पाण्याखाली गेले आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी हिडकल जलाशयातील पाणीपातळी कमी झाल्यामुळे विठ्ठल रखुमाई मंदिराचे दर्शन कित्येक वर्षांनी लाखो नागरिकांनी घेतले होते. मात्र आता गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने जलाशयाची पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे मंदिर पाण्याखाली गेलं असून फक्त कळसाचे दर्शन नागरिकांना होत आहे. महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून गेल्यावर्षी विठ्ठल मंदिराचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती तर आता हे संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेला आहे आणि कळसाचे दर्शन होत आहे.


Share News