पर्यटकांच्या सुरक्षेचे दृष्टिकोनातून खबरदारी घेणे गरजेचे
मगरींचा सहवास असल्याचा फलक लावणे गरजेचे
पर्यटकांच्या जीवाशी खेळ
एखादा अघटित प्रकार घडल्यास पर्यटकच जबाबदार असल्याचा त्यांच्याकडून कागदावर घेण्यात येतेय सही
बोर्ड लावल्यास पर्यटक न येण्याची भीती
कारवार जिल्ह्यातील गणेश गुडी येथील काळी नदीपात्रात राफ्टिंगला कारवार जिल्हाधिकाऱ्याने पुन्हा काही नियम व अटी घालून सुरू करण्यास परवानगी दिली आहे पण गणेशगुढी येथे 10 वॉटर ऍक्टिव्हिटीजच्या जेटी असून या ठिकाणी देशा विदेशातून पर्यटक राफ्टिंग तसेच इतर वॉटर ऍक्टिव्हिटी करण्यासाठी येत असतात. यावेळी आलेल्या पर्यटकांकडून राफ्टिंग तसेच वॉटर ऍक्टिव्हिटी करतेवेळी एखादा अघटित प्रकार घडल्यास पर्यटकच जबाबदार असल्याचा त्यांच्याकडून लिहून ठेवलेल्या कागदावर सही घेण्यात येते
अनेक वेळा काळी नदीपात्रात बोट उलटून अनेक पर्यटक पाण्यामध्ये पडतात व जखमी ही होतात. अश्यावेळी एखादा पर्यटक पडून अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण ? असाही प्रश्न पुढे उभे राहत आहे .काळी नदीपात्रात मगरीचाही वावर असून पर्यटकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मगरीचा वावर असल्याचे फलक लावणे गरजेचे आहे. एखादा अनुचित प्रकार घडण्या पूर्वी प्रशासनाने याची दखल घेऊन पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असणारे सूचना फलक लावणे गरजेचे आहे.जर फलक लावण्यात आले तर पर्यटक येणारच नाही या भीतीने फलक लावण्यास टाळाटाळ करण्यात येतेय .मात्र यामुळे पर्यटकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.