अंजलीला न्याय देण्यासाठी कोळी समाज रस्त्यावर
हुबळी येथील एका 21 वर्षीय युवतीचा खून दोन दिवसापूर्वी करण्यात आला.
प्रेमाला नकार दिल्याने प्रियकरांने ( गिरीश सावंत )याने पहाटेच्या सुमारास अंजली आंबिगेर या तरुणीच्या घरात शिरून चाकूने भोसकून खून केला . याआधी त्याने अंजलीला मला तू होकार दे नाहीतर नेहा हिरेमठ प्रमाणे तुला मारून टाकू अशी धमकी दिली होती .त्यामुळे अंजली अंबिगेर या तरुणीला न्याय मिळाला पाहिजे याकरिता आज बेळगावातील कोळी समाज एकवटला आणि अंजलीला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी निषेधारद्वारे केली.
कोळी समाजाने आज चन्नमा सर्कल येथे साखळी करून आंदोलन केले त्यानंतर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर केले.