हलात्री नदी पुलावरून दुचाकीसह व्यक्ती वाहून गेला!
सुदैवाने नदीकाठची झुडपाची काठी पकडल्याने जीव वाचला!
खानापूर ; गोव्याहून, हेमाडगा मार्गे खानापूरकडे आपल्या स्प्लेंडर दुचाकीवरून येत असणारा, शहापूर बेळगावचा व्यक्ती विनायक जाधव, याने मंणतूर्गा जवळील हालात्री नदीवरील, पाणी असलेल्या पुलावर दुचाकी घातल्याने, दुचाकीसह वाहून जात असताना, नदीकाठावरील एका झुडपाची काठी पकडली, त्यामुळे त्या ठिकाणी तो अडकून राहिला. याबाबतची बातमी वाऱ्यासारखी पसरली असता, खानापूर येथील अग्निशामक दलाची गाडी, व नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी अग्निशामक जवळ असलेली दोरी घेऊन, सामाजिक कार्यकर्ते विनायक मुतगेकर व भाजपा युवा मोर्चा जिल्हा सेक्रेटरी पंडित ओगले यांनी, सदर व्यक्तीला दोरीच्या साह्याने बाहेर काढले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. परंतु स्प्लेंडर दुचाकी वाहून गेली.
सदर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, जीव धोक्यात घालून, दुचाकी पाण्यात घातल्याबद्दल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.