Share News

कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार खास.छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान

बेळगावचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत स्वातंत्र्य सेनानी व संयुक्त महाराष्ट्र चळवळ येथील एक नेते कॉम्रेड कृष्णामेणसे यांना महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार कोल्हापूरचे माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे .महात्मा गांधी विचार मंच गडहिंगलज जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 12 वाजता ज्योती महाविद्यालय क्लब रोड बेळगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमातस व खासदार छत्रपती शाहू महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . प्रारंभी म गांधींची प्रार्थना म्हणण्यात आली त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांचे स्वागत करण्यात आले .याप्रसंगी कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार देण्यात आला.याप्रसंगी सीमा भागातील मराठी जनता मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share News