दोन सख्ख्या भावांचा खून
मुलीच्या छेडछाडीमुळे बापाचे कृत्य
आपल्या मुलीची छेडछाड केल्या प्रकरणे बापाने दोन सख्या भावांचा खून केला आहे. त्यामुळे या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात ही घटना घडली असून या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे.
मायाप्पा सोमाप्पा अळगोडी वय 20 व यल्लाप्पा सोमपा अळगोडी वय 22 दोघेही राहणार दुंडणकोप तालुका सौंदत्ती अशी मृत झालेल्या सख्या भावांची नावे आहेत
मायाप्पा हा एका अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडला होता.या आदी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी म्हणजे फकीराप्पा यांनी आपली मुलगी लहान आहे तिला त्रास देऊ नकोस असे मायाप्पाला सांगितले होते, मात्र वारंवार सांगूनही मायाप्पाच्या वागण्यात फरक पडला नव्हता. तिच्याशी लग्न करतो म्हणून त्याने हट्ट धरला होता.
यावेळी मायाप्पा हा अल्पवयीन मुलीच्या घरासमोर जाऊन भांडण काढले यावेळी तुझ्या मुलीशी आपल्याला लग्न करायचे आहे, करून घेणार की नाही असा दम भरला. त्यामुळे फकीराप्पा चिडला त्याने घरातील चाकू आणून रस्त्यावर थांबलेल्या मायाप्पावर सपासप वार केला. घाव वर्मी बसल्याने मायाप्पाचा जागीच मृत्यू झाला यावेळी मायाप्पा चा मोठा भाऊ यल्लाप्पा देखील तेथेच होता. मायाप्पा ला मारताना तो फकीरापाला अडविण्यासाठी गेल्यानंतर त्याच्यावरही वार त्याने केले. त्यामुळे या घटनेत तो देखील गंभीर जखमी झाला यावेळी गावकऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचाही मृत्यू झाला त्यामुळे या घटनेत दोन सख्या भावांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संशयीताला अटक केली आहे.