*विकास करणाऱ्या शिवाभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज…शिवाजीभाऊ गोरगरिबांचा नेता!*
चंदगड,गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील नाभिक समाज बांधवांनी श्री.शिवाजी पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. शिवाजी पाटील यांनी गेल्या ५ वर्षात कोणतीही सत्ता, पद नसताना जे काम केलं आहे ते काम खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे संपूर्ण नाभिक समाज आज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.