Share News

महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांचे शक्ती प्रदर्शन

 

शक्ती प्रदर्शन करून भरला उमेदवारी अर्ज

मराठी अस्मिता मराठ्यांची ताकद दाखविण्याकरिता लढणार निवडणूक

 

 

महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांनी आज बेळगाव शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला.
प्रारंभी त्यांनी शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन केले आणि त्यानंतर पारंपारिक पद्धतीने बैलगाडीत विराजमान होत शक्ती प्रदर्शन केले.

यावेळी या शक्ती प्रदर्शनात ढोल ताशा पथक, भगवे झेंडे, भगवे फेटे परिधान करून असंख्य महिला शक्ती प्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या मराठ्यांच्या अस्मिताने ताकद दाखविण्याकरिता आज सर्वजण एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी सर्वांनी येणारे निवडणुकीत समितीला भरघोस मतांनी विजयी करून देण्याचा निर्धार व्यक्त केला.


Share News