19d573af56094406869595eaf9445647
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुरुंगातून फोन करणाऱ्या कैद्याने ५० हजार रुपयांची मागणी केली होती आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती त्या कैद्याला आता काल सोमवारी रात्री नागपुरातून विमानाने आणून हिंडलगा कारागृहात पाठवण्यात आले.
नागपुरातूनच उग्र अक्तर पाशा यांना विमानाने बेळगावात आणण्यात आले .पाशाचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत. नुकतेच बेळगाव न्यायालयाच्या आवारात जयेश पुजारी या कैद्याने पाकिस्तान समर्थक घोषणा देत हिंडलगा कारागृहातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून २०० कोटी रुपये मागितले आणि ते पैसे न दिल्यास जीवे मारू अशी धमकी दिली होती
या पार्श्वभूमीवर अक्तर पाशा आणि जयेश पुजारी यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. नागपूर पोलिसांनी जयेश पुजारीला काही दिवसांपूर्वी हिंडलगा येथे पाठवले होते. आता अतिरेकी अखतर पाशा याला नागपूर मध्यवर्ती कारागृहातून विमानाने बेळगावात आणून कडक पोलीस बंदोबस्तात हिंडलगा कारागृहात पाठवण्यात आले आहे. अकबर पाशा यांचा बंगळुरू येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालय स्फोट प्रकरणात हात असल्याचे सांगण्यात येत आहे.