Share News

15 किलो अजिनोमोटो जप्त

अजिनोमोटो विक्री करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले

अजिनोमोटो व चिकन कबाब साठी रंग वापरल्यास कारवाई करणार

मुख्याधिकारी निडवणी यांचा इशारा

 

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील
एग राईस चिकन कबाब फूड स्टॉलसह किराण दुकानांवर छापा टाकून 15 किलो अजिनोमोटो जप्त केल्याची घटना सायंकाळी चिकोडी शहरात घडली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी की शहरात फूड स्टॉलवर हॉटेलमध्ये अजिनोमोटो चा वापर करून खाद्यपदार्थ विक्री करत असल्याचा तक्रार नगर परिषदेला आले होते. त्या तक्रारीनुसार चिकोडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी महानतेश निडवणी व आरोग्य निरीक्षक आर एम चिनगुंडी त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध दुकानांवर छापा टाकला.
य तीन दुकानांमध्ये 15 किलो हून अधिक खाद्यपदार्थात वापरले जाणारे निषेधित अजिनोमोटो आढळले आहे. सदर अजिनोमोटो जप करून संबंधित दुकानदारांना समज देऊन नोटीस देण्यात आली आहे.
त्यामुळे चिकोडी शहरातील खाद्यपदार्थांचे व्यापारी व अजिनोमोटो विक्री करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दाणाणले आहेत.
चिकोडी शहरात एग राईस चना मसाला दुकानांसह खाद्यपदार्थाच्या दुकानांमध्ये अजिनोमोटो वापरत असलेली तक्रार नगर परिषदेला आली होती. त्यानुसार छापा टाकून सदर दुकानांमधून अजिनोमोटो जप करण्यात आले आहे.


Share News