Share News

गोवा

कळणे नदीला पूर आल्याने चांदेल मधील रस्ता पाण्याखाली

गोव्यात मागच्या दोन दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र व उत्तर गोव्यातील सीमा भागातील नद्यांना महापूर आला आहे. उत्तर गोव्यातील पेडणे, बिचोली साखळी, धाराबंडोडा तालुक्याला पावसाचा फार मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होत अनेक घरात पाणी घुसला. महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणातून फार मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे दोडामार्ग तालुक्यासह गोव्यातील पेडणे तालुक्याला पाण्याचा पुराचा तडाखा बसला. डिचोली शहरात पाणी घुसल्यामुळे प्रशासनासह, नागरिकांची देखील तारांबळ उडाली आहे. तिलारी , मांडवी, चापोरा व कुशावती नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे उत्तर गोव्यात पूरस्थिती निर्माण झाली आहेत्यामुळे नदीला पूर आला आहे येथील कळणे नदीला पूर आल्याने चांदेली मधील रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे चांदेली गावचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे . कासारवर्णतही पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. येथील पुलावर गुडघाभर पाणी आले असल्याने नागरिक जीव धोक्यात घालून एका बाजूने दुसऱ्या बाजूने जात आहेत. तसेच पुलावरील वाहतूक देखील ठप्प करण्यात आली आहे . कासारवर्णीत पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे.


Share News