महाराजांच्या जय घोषाने नेहरू नगर, सदाशिव नगर परिसर गेला दुमदुमून
थंडीत शिवप्रेमींची दौडीत उपस्थिती
भगवेमय वातावरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषाने नेहरू नगर, सदाशिव नगर परिसर दुमदुमून गेला. निमित्त होते शिव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौडीच्या सातव्या दिवशीचे!
सकाळी पडलेल्या गुलाबी थंडीत आणि धुक्यात शिवप्रेमींनी हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन देव,देश,धर्माच्या रक्षणासाठी चाललेल्या दौडी मध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी महिलांनी काढलेल्या रांगोळ्या, शिवप्रेमींन वर होणारी पुष्प वृष्टी, दारोदारी होणारे स्वागत यामुळे वातावरण उत्साही बनले होते.
नेहरू नगर येथील बसवाण्णा मंदिर येथून दौडीस प्रारंभ झाला.सदाशिव नगर, नेहरू नगर, सुभाष नगर, गँगवाडी, रामनगर, अशोक नगर, शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिर येथी दौडीची सांगता करण्यात आली.