केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा आर्थिक वाढ, वित्तीय शिस्त आणि विविध क्षेत्रांना लक्ष केंद्रीत करत समतोल साधणारा-सतीश तेंडुलकर
केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा आर्थिक वाढ, वित्तीय शिस्त आणि विविध क्षेत्रांना लक्ष केंद्रीत पाठबळ यांचा समतोल साधणारा असल्याचे दिसून येते असलयाची प्रतिक्रिया बेलगाम क्लॉथ सिल्क अँड टेक्सटाईल्स असोसिएशन
अध्यक्ष, ट्रेडर्स कौन्सिल, बेळगावी
माजी अध्यक्ष, बेलगाम चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे सतीश तेंडुलकर
यांनी व्यक्त केले.
पायाभूत सुविधा व विकासासाठी सार्वजनिक भांडवली खर्चात वाढ केल्याने उद्योगविश्वात विश्वास निर्माण होईल तसेच रोजगारनिर्मितीस चालना मिळेल, असा सकारात्मक संदेश या अर्थसंकल्पातून मिळतो असे म्हंटले आहे
तर उत्पादन क्षेत्र व एमएसएमई उद्योग बळकट करण्यावर देण्यात आलेला भर — विशेषतः इंडिया सेमीकंडक्टर मिशन २.० तसेच लघु उद्योगांसाठी वाढीव पतसुविधा — हे अत्यंत स्वागतार्ह पाऊल आहे. अशा उपाययोजनांमुळे भारतीय उद्योगांना जागतिक मूल्यसाखळीत सहभागी होण्यास व निर्यात वाढविण्यास मदत होईल.
कापड, वस्त्र व रेशीम उद्योगासाठी वस्त्रोद्योग क्लस्टरचे आधुनिकीकरण, रोजगारनिर्मितीला चालना आणि विविध योजनांच्या माध्यमातून स्पर्धात्मकता, बाजारपेठेतील प्रवेश व मूल्यवर्धन वाढविण्याची मांडलेली दिशा आम्हाला समाधानकारक वाटते.
रेल्वे व लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अनुभवाच्या आधारे सांगायचे झाल्यास, पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी व मालवाहतुकीवर दिलेला भर हा उत्पादन व व्यापार क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई–पुणे यासह ७ उच्चगती रेल्वे मार्गांच्या विकासाचे स्वागत आहे. मात्र खेदाने नमूद करावे लागते की दक्षिण विभागातील रेल्वे व विशेषतः दक्षिण पश्चिम रेल्वे, हुबळी विभाग — ज्यामध्ये बेळगावचा समावेश होतो — यांना या अर्थसंकल्पात ठोस लाभ मिळालेला नाही.
एकूणच हा अर्थसंकल्प शाश्वत विकास, औद्योगिक विस्तार व सर्वसमावेशक प्रगतीसाठी मजबूत पाया घालणारा आहे. धोरणकर्त्यांसोबत सहकार्य करत या योजनांचे लाभ प्रत्यक्ष व्यवसाय, कामगार व समाजापर्यंत पोहोचवण्याची अपेक्षा आहे. कोणताही बदल एका रात्रीत घडत नाही, हे वास्तव असून, येणाऱ्या काळातील जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाचे मूल्यमापन अधिक स्पष्टपणे होईल, असा विश्वास आहे.

