रामतीर्थ नगरमध्ये ४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी बेळगाव अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (बुडा)च्या अधिकाऱ्यांसमवेत रामतीर्थ नगर परिसराला भेट देत विविध विकासकामांचे भूमिपूजन केले.
रामतीर्थ नगरमधील बसवेश्वर बदावणे, मशिदीसमोरील लाईन परिसर तसेच एरोकिड्स शाळेजवळील परिसरात ही विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी अंदाजे ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ही कामे बुडा राबवत असलेल्या २५ कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचा भाग आहेत.
रामतीर्थ नगरमधील विविध भागांमध्ये विकासकामांची सुरुवात केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार आसिफ (राजू) सैत यांचे कौतुक केले. या उपक्रमामुळे परिसरातील पायाभूत सुविधा सुधारण्यासोबतच आमदार आणि नागरिकांमधील थेट संपर्क अधिक मजबूत होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या प्रसंगी ताहिर सय्यद, एन. बी. निरवाणी (माजी महापौर), हनमंत कोंगाळी (नगरसेवक), सुरेश यादव, सुरेश उर्बिनट्टी, नागेश सांगली, दिलावर कांबरगानवी, एम. एम. किट्टूर, डी. के. भुती, पुष्पा परवत राव, बसवराज कोत्राशेट्टी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

