Share News

स्वातंत्र्यदिनानिमित्त ज्योतिलिंग देवस्थानात तिरंग्याचा साज

बेळगाव : स्वातंत्र्यदिनानिमित्त नार्वेकर गल्ली येथील ज्योतिलिंग देवस्थानात ज्योतिबा देवाला तिरंग्याचा पोशाख परिधान करून देशभक्तीचा अनोखा संदेश देण्यात आला.

यावेळी सकाळी देवाची विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले. तिरंग्याच्या पोशाखातील ज्योतिबा देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आणि भक्तिभावाने दर्शनाचा लाभ घेतला.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात धार्मिक श्रद्धेसोबतच देशभक्तीची भावना जागृत करणारे हे दृश्य भाविकांसाठी आकर्षण ठरले.


Share News