Share News

रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलतर्फे इंटरॅक्ट क्लब पदग्रहण सोहळा

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलच्या प्रायोजकत्वाखाली ध्यान प्रबोधन मंदिर विद्यालयाच्या इंटरॅक्ट क्लबच्या सन २०२६-२७ च्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला.

सहाय्यक प्रांतपाल रोटेरियन रमेश रामगुरवाडी यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांना पद व शपथ देण्यात आली. यामध्ये अनिका बार्डे (अध्यक्षा), अनन्या मेडर (सचिव), बूवी भट (उपाध्यक्षा) आणि आराध्या भोसले (खजिनदार) यांचा समावेश आहे.

मुख्याध्यापिका सौ. मंजिरी रानडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन अभय जोशी यांनी विद्यार्थ्यांना समाजसेवा व नेतृत्व विकासासाठी इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास रोटरीचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share News