Share News

दुपदरीकरण व विद्युतीकरणानंतर रेल्वे संपर्क वाढविण्याची मागणी; बेळगाव रेल्वे स्थानकात व्यापारी संघटनांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

बेळगाव : बेळगाव–गोवा दरम्यान रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण व दुपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्याबाबत सोमवारी (४ ऑगस्ट) सकाळी ११.३० वाजता बेळगाव रेल्वे स्थानकाच्या कार्यालयीन विश्रांतीगृहात दक्षिण पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी (SS, SWR) दशरथ प्रसाद यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत बेळगाव–गोवा मार्गावरील रेल्वे सेवांचा विस्तार, तसेच हुबळी–लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे जोडण्याची मागणी करण्यात आली. या उपाययोजनांमुळे बेळगाव विभागातील व्यापार, उद्योग आणि वाणिज्य क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असे व्यापारी संघटनांनी नमूद केले.

बैठकीदरम्यान या सर्व मागण्यांचे सविस्तर निवेदन दक्षिण पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक (GM), रेल्वे मंत्रालय आणि नवी दिल्ली येथील रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आले


Share News