Share News

*बेळगाव सिटी टॉपर म्हणून आकाश संस्थेच्या विद्यार्थ्याची राघवेंद्र जोशीची कामगिरी*

*बेळगाव, जुलै 18, 2026*: परीक्षा तयारी सेवांमध्ये देशात आघाडीवर असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) संस्थेच्या बेळगाव शाखेच्या विद्यार्थ्याने राघवेंद्र जोशीने NEET UG 2026 परीक्षेत 1268 वी ऑल इंडिया रँक (AIR) मिळवून बेळगाव सिटी टॉपर होण्याचा मान मिळवला आहे.

आपल्या यशाबद्दल बोलताना राघवेंद्र जोशी म्हणाले, “AIR 1268 रँकसह सिटी टॉपर होणे हे माझे स्वप्न होते. माझ्या पालकांचा पाठिंबा आणि आकाश संस्थेच्या व्याख्यात्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झाले. संस्थेच्या मॉक टेस्ट, शंका निरसन सत्र आणि शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरणाने माझ्या तयारीला भक्कम पाया दिला,” असे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

AESL चे अकॅडेमिक्स आणि बिझनेस हेड धीरज कुमार मिश्रा म्हणाले, “राघवेंद्रची शिस्त आणि सातत्यपूर्ण कामगिरी ही संपूर्ण आकाश संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबाला अभिनंदन.”

यावर्षी राष्ट्रीय स्तरावर आकाश संस्थेचे 4 विद्यार्थी टॉप 10 मध्ये आणि 41 विद्यार्थी टॉप 100 मध्ये स्थान मिळवले आहेत. कर्नाटकातील इतर यशस्वी विद्यार्थी: जोहान जॉब (AIR 69), केव्हिन (AIR 299), सिद्धांत विनय (AIR 579) आणि अभिराम ए.पी. (AIR 623) यांनीही उत्कृष्ट रँक मिळवले आहेत. तज्ज्ञ व्याख्याते आणि AI-आधारित विश्लेषण असलेली संपूर्ण शिक्षण प्रणाली हेच विद्यार्थ्यांच्या या असाधारण यशाचे कारण आहे, असे संस्थेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या पत्रकार परिषदेला अशीफअली अंगडी – ब्रँच हेड (शाखा प्रमुख), विजयकुमार सी. एच. – असिस्टंट डायरेक्टर (सहाय्यक संचालक) आणि अनिल कुमार एच. आर. उपस्थित होते.


Share News