Share News

पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा स्वयंसेवी संस्थांकडून सत्कार

बेळगाव : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल डॉ. प्रभाकर बसवप्रभू कोरे यांचा बेळगावातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या वतीने महेश्वरी अंध विद्यालयात सत्कार करण्यात आला.

शांताई वृद्धाश्रम, स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठान, महेश फाउंडेशन, आश्रय फाउंडेशन, जीवन आधार फाउंडेशन, स्नेहालयसह विविध संस्थांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला सर्व संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक व रहिवासी उपस्थित होते.

यावेळी वक्त्यांनी डॉ. कोरे यांच्या शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव केला. केएलई संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्वयंसेवी संस्थांना दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. पद्मश्री हा त्यांच्या निस्वार्थ समाजसेवेचा योग्य गौरव असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी महापौर विजय मोरे यांनी केले, तर अध्यक्षस्थानी चिंतामणी ग्रामपाद्य होते. राणी नागरत्ना यांनी आभार मानले.


Share News