Share News

बेळगावात एलपीजी ऑटो गॅसचा तुटवडा; वाहनचालक त्रस्त

बेळगाव शहरामध्ये सध्या एलपीजी ऑटो गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील सुमारे 10 ते 12 एलपीजी गॅस पंपांवर गॅस उपलब्ध नसल्यामुळे ऑटोचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या केवळ एका गॅस पंपावरच एलपीजी गॅस उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्या पंपावरील मशीन वारंवार बंद पडत असल्यामुळे गॅस भरण्यासाठी आलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

यामुळे ऑटोचालकांचा वेळ वाया जात असून, रोजच्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे. अनेक चालकांनी प्रशासनाकडे तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


Share News