बेळगाव रेल्वेस्थानकावर अनोळखीचा मृत्यू
रेल्वेत चढताना पाय घसरून रेल्वेरूळावर पडला
बेळगाव : रेल्वेत चढताना पाय घसरून खाली पडल्याने रूळाखाली सापडून एका अनोळखी प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी अनोळखी सायंकाळी बेळगाव रेल्वेस्थानकावर ही घटना घडली असून बेळगाव रेल्वे पोलिसांनी सुमारे ५० ते ५५ वर्षीय अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. शुक्रवार दि. ३१ जुलै रोजी सायंकाळी राणी चन्नम्मा एक्स्प्रेस रेल्वेत चढताना पाय घसरून खाली पडल्याने ही घटना घडली आहे. ५ फूट ५ इंच उंची, काळसर वर्ण, अंगाने सडपातळ, उभट चेहरा मयत प्रवासी असे त्याचे वर्णन आहे. त्याने फ्रेंच कट दाढीमिशी ठेवली आहे. त्याच्या अंगावर हिरवे हाफ कलर टी-शर्ट, करडी पँट परिधान केली आहे. त्याच्याजवळ चौकडा लायनिंग टॉवेलही आढळून आला आहे. या प्रवाशाची ओळख पटवण्यासाठी ०८३१-२४०५२७३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बेळगाव रेल्वे पोलिसांनी केले आहे

