Share News

बेळगाव जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला उद्यापासून प्रारंभ

बेळगाव : जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत असून, एकूण 34,667 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. बारावीच्या परीक्षा संपताच दहावीच्या परीक्षेला प्रारंभ होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तयारीची गती वाढली आहे.

शहरातील मराठा मंडळ शाळा मध्ये परीक्षेसाठी बैठक क्रमांक लावण्याचे काम सुरू असून, सर्व व्यवस्था अंतिम टप्प्यात येत आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व परीक्षेतील पारदर्शकतेसाठी सीसीटीव्हीची करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

परीक्षा 18 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत टप्प्याटप्प्याने पार पडणार आहेत. यामध्ये विद्यार्थी व्यवस्थापन, केंद्रावरच्या शिक्षकांचे समन्वय, बैठकीची रचना व परीक्षेच्या सुचनेची काटेकोर अंमलबजावणी यावर भर देण्यात आला आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांना वेळेवर सूचना व मार्गदर्शन देण्याची जबाबदारी घेतली आहे, जेणेकरून परीक्षेचे वातावरण शांत व सुव्यवस्थित राहावे.

याशिवाय पालक व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मानसिक आधार देऊन परीक्षेसाठी तयारी करण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांचे भविष्यातील शिक्षण व करिअर यावर परिणाम होणार असल्यामुळे सर्व स्तरांवर तयारीची गंभीरता दिसून येत आहे.


Share News