उत्तर कर्नाटकात ‘ग्राफी शेप मेमरी अलायनर’ तंत्रज्ञानाची सुरुवात
बेळगाव
बेळगावातील वन डेंटल क्लिनिकतर्फे आधुनिक ऑर्थोडॉन्टिक उपचार क्षेत्रात नवे पाऊल टाकत ग्राफी शेप मेमरी अलायनर टेक्नॉलॉजीची सुरुवात करण्यात आली आहे. उत्तर कर्नाटकात हे अत्याधुनिक तंत्रज्ञान सुरू करणारे वन डेंटल हे पहिले दंतचिकित्सा केंद्र ठरले आहे.
या निमित्ताने आज ६ मार्च रोजी वन डेंटल येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला ग्राफी (दक्षिण कोरिया) कंपनीच्या टीममधील श्री. लुईस आन (डायरेक्टर – सेल्स टीम), श्री. तन्वीर (चीफ केमिकल इंजिनिअर), मिस अपूर्वा तसेच डॉ. मयुरी धाकोजी उपस्थित राहून या तंत्रज्ञानाची माहिती दिली .
आधुनिक ऑर्थोडॉन्टिक उपचारांमधील त्याचे फायदे स्पष्ट केले.
ग्राफीचे शेप मेमरी अलायनर्स (SMA) हे क्लिअर अलायनर्सच्या नव्या पिढीतील तंत्रज्ञान मानले जाते. पारंपरिक अलायनर्सच्या तुलनेत हे अलायनर्स अत्याधुनिक ‘शेप मेमरी मटेरियल’ वापरून तयार केले जातात. त्यामुळे दातांवर सतत आणि सौम्य दाब निर्माण होऊन दातांचे अधिक प्रभावी आणि अचूक हालचाल होते.
या तंत्रज्ञानामुळे दंतचिकित्सकांना रुग्णांच्याजेनुसार अत्यंत अचूक आणि सानुकूलित अलायनर्स तयार करता येतात. परिणामी रुग्णांना अधिक आरामदायी, जलद आणि विश्वासार्ह ऑर्थोडॉन्टिक उपचाराचा अनुभव मिळतो.
या नव्या सुविधेमुळे वन डेंटलने जागतिक दर्जाचे दंततंत्रज्ञान स्थानिक रुग्णांपर्यंत पोहोचवण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अधिक बळ दिले आहे.
हा उपक्रम उत्तर कर्नाटकात डिजिटल ऑर्थोडॉन्टिक्स आणि आधुनिक स्माईल करेक्शन उपचारांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार संजय पाटील हे उपस्थित राहून डॉ मयुरी धाकोजी यांना शुभेच्या दिल्या

