श्रीशैलवरून परतताना क्रूझरचा अपघात; बेळगावच्या तिघांचा मृत्यू
श्रीशैल मल्लिकार्जुन स्वामी मंदिर येथे दर्शन घेऊन परत येत असताना क्रूझर वाहन आणि लारी यांच्यात भीषण अपघात होऊन चिकोड़ी तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी मार्कापुरम जिल्हा मधील तिप्पायपालेम जवळ घडली.
मृतांमध्ये एक्संबा येथील अजित सातवार (28), गौरव (40) आणि अलका शिंदे (60) यांचा समावेश आहे.
माहितीनुसार, श्रीशैल येथे मल्लिकार्जुन स्वामींच्या दर्शनासाठी 14 जण क्रूझर वाहनातून गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना मार्कापुरम जिल्ह्यातील तिप्पायपालेम जवळ कर्नूलहून नलगोंडा येथे कच्ची केळी घेऊन जाणाऱ्या लारीने क्रूझरला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला.
या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नंद्याल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती मार्कापुरमचे वर्तुळ निरीक्षक पी. सुब्बाराव यांनी दिली.

