Share News

विमा रक्कम वाढविण्याची पत्रकार संघटनेची मागणी

बेळगाव महानगरपालिकेने शहरातील पत्रकारांसाठी आरोग्य विमा योजना राबवून राज्यासमोर एक सकारात्मक आणि आदर्श पाऊल टाकले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही योजना प्रभावीपणे कार्यान्वित असून अनेक पत्रकारांना तिचा लाभ मिळाला आहे. मात्र सध्या पत्रकारांची संख्या वाढली असताना अद्याप काही पात्र पत्रकार या योजनेपासून वंचित राहिले आहेत.

या पार्श्वभूमीवर सर्व पात्र पत्रकारांना आरोग्य विम्याचा लाभ देण्यात यावा तसेच विमा रक्कम वाढविण्यात यावी, अशी ठोस मागणी पत्रकार संघटनेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन महानगरपालिकेचे आयुक्त कार्तिक एम. यांना सादर करण्यात आले.
सध्या पत्रकार कल्याण निधीसाठी ५० लाख रुपयांचे अनुदान राखीव ठेवण्यात आले आहे. मात्र वाढती पत्रकार संख्या आणि झपाट्याने वाढणारा वैद्यकीय खर्च लक्षात घेता ही रक्कम अपुरी ठरत असून ती वाढवून किमान ७५ लाख रुपये करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करन्यात आली


Share News