पोलिसांसाठी भव्य वसाहत उभारणार
कॉन्स्टेबलपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना चांगली घरे हवीत, यासाठी मी गृहमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे, आता पहिल्या टप्प्यातील कामाला प्रारंभ झाला आहे. एकूण २ कोटी २१ लाखांचा हा प्रकल्प वर्षभरात पूर्ण होईल, अशी माहिती आमदार राजू सेट यांनी दिली.
येथील पोलिस वसाहतीत उभारण्यात येणाऱ्या नूतन वसाहतीचे भूमिपूजन आमदार सेट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन यावेळी उपस्थित होते.

