रयत गल्लीतील विहिरीत ड्रेनेज मिश्रित पाणी – जनतेच्या आरोग्यावर गंभीर धोका
वडगाव: रयत गल्लीतील विहिरीत आता केवळ स्वच्छ पाणी मिळणे कठीण झाले आहे. १९३६ साली येळ्ळूर तालुका लोकल बोर्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी काढलेली ही विहीर, आजही परिसरातील नागरिकांसाठी वरदान ठरली होती. मात्र, स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांतर्गत विहिरी मुजवण्याचे प्रयत्न झाले, पण नागरिकांच्या विरोधामुळे विहीर संरक्षित राहिली.
अनेक वर्षांनी नळाचे पाणी अपुरी पडल्यामुळे विहिरीवरील अवलंबित्व वाढले. मागील नगरसेवक तसेच तत्कालीन महापौर संभाजी पाटिल यांनी विहिरीच्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते रयत गल्ली व आसपासच्या भागात पोहोचवले. परिणामी विहीर काळासाठी दिलासादायक ठरली.
पण आता विहिरीत आणि आजूबाजूच्या बोअरमध्ये ड्रेनेज मिश्रित पाणी येऊ लागल्याने ती वापरासाठी अपुर्या ठरत आहे. उग्र वासामुळे जनावरही पाणी पित नाहीत. एल अँड टीच्या अधिकाऱ्यांनी ब्लिचिंग पावडर टाकून प्रयत्न केला, पण परिस्थितीत काही फरक पडलेला नाही.
विशेष म्हणजे रयत गल्लीतील हातपंप बोरनाही आता बंद पडलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात परिसरात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष भासण्याची शक्यता आहे.
परिसरातील लोकप्रतिनिधींनी तातडीने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन विहिरीतील आणि बोअरमधील ड्रेनेज मिश्रित पाण्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा नागरिक, शेतकरी आणि जनावरांसह परिसरातील लोक मोर्चा काढण्यास बाध्य होतील.

