Share News

उद्या बेळगावात रमजान ईद उत्साहात साजरी होणार

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात उद्या शनिवारी रमजान ईद, म्हणजेच ईद-उल-फित्र, मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. हा निर्णय अंजुमन संस्था आणि चांद कमिटी यांनी जाहीर केला आहे.

अंजुमन संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार असिफ सेठ यांनी सांगितले की, गुरुवारी सायंकाळी चांद कमिटीमार्फत चंद्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर मुस्लिम समाजातील धर्मगुरू आणि जमात प्रमुख यांच्या उपस्थितीत शनिवारी ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शनिवारी सकाळी ९.३० वाजता बेळगाव येथील ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा करण्यात येणार आहे.

अंजुमन-ए-इस्लामच्या उलेमा-ए-कराम यांच्या निर्णयानुसार, २१ तारखेला हा सण साजरा केला जाणार आहे.


Share News