Share News

९५% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

बेळगाव : आमदार Asif Raju Sait यांनी अल्पसंख्याक कार्यालयाला भेट देत परीक्षेत ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा व शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव यावेळी करण्यात आला.

ARS Foundation च्या पुढाकारातून प्रत्येक विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.

या कार्यक्रमात Morarji Desai School आणि मुदलगी येथील तीन उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आमदार सैत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले व भविष्यात अधिक उंच ध्येय ठेवण्याचा सल्ला दिला.

यावेळी बोलताना त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सत्कार सोहळा प्रेरणादायी ठरला.


Share News