Share News

श्री स्वामी समर्थ भक्तपरिवारात भक्तिमय वातावरणात अभिषेक, लाख नामस्मरण व आरती सोहळा

बेळगाव : श्री स्वामी समर्थ भक्तपरिवाराच्या वतीने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी गुजरात भवन, बेळगाव येथे सायंकाळी ४ ते ६ या वेळेत श्री स्वामी समर्थ महाराजांचा पवित्र अभिषेक, लाखाचा नामस्मरण सोहळा, आरती आणि प्रसाद वितरणाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विधीवत अभिषेकाने झाली. त्यानंतर हजारो वेळा स्वामी नामाचा जप करत लाख नामस्मरणाचा सोहळा पार पडला. उपस्थित स्वामी भक्तांनी एकचित्ताने “श्री स्वामी समर्थ” या मंत्राचा अखंड जप करून संपूर्ण सभागृह भक्तिरसाने भारावून टाकले.

यानंतर महाआरती करण्यात आली. आरतीच्या मंगल स्वरांनी वातावरण अधिकच प्रसन्न व अध्यात्ममय झाले. भक्तांनी स्वामी महाराजांच्या चरणी सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीची प्रार्थना अर्पण केली.

आरती व नामस्मरणानंतर सर्व स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या भक्तिमय सोहळ्यामुळे उपस्थितांना आत्मिक समाधान व दिव्य अनुभूती लाभली.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री माहंतेश सिद्धाप्पा हलगी व सौ. प्रतीक्षा माहंतेश हलगी यांनी केले होते. स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.


Share News