कंग्राळी बी.के. येथील शालेय विद्यार्थी बेपत्ता; शोधासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन
बेळगाव प्रतिनिधी :
बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी.के. येथील स्वयंम अमर बसरीकट्टी हा शालेय विद्यार्थी शनिवारी (दि. 25 ) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास शाळेतून बाहेर पडला. मात्र, त्यानंतर तो घरी परतलेला नसल्याने कुटुंबीयांसह संपूर्ण गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाळा सुटल्यानंतर स्वयंम घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रमंडळी तसेच परिचितांकडे चौकशी केली. त्याचबरोबर परिसरातील विविध ठिकाणी शोधमोहीमही राबविण्यात येत आहे. मात्र, अद्याप त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
या पार्श्वभूमीवर स्वयंम अमर बसरीकट्टी हा मुलगा कुठेही दिसल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तात्काळ त्याचे वडील अमर बसरीकट्टी (मसनाई गल्ली) किंवा मसनाई युवक मंडळ यांच्याशी संपर्क साधून कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक : 9535456921
स्वयंमचा लवकरात लवकर शोध लागावा, यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही खात्रीलायक माहिती मिळाल्यास ती त्वरित संबंधित कुटुंबीयांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

