Share News

भरधाव कारने चिरडल्या ४८ मेंढ्या; १५ हून अधिक गंभीर जखमी

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील जाळीकोप्प गावाजवळ भरधाव कारने मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिल्याने ४८ मेंढ्यांचा जागीच मृत्यू, तर १५ हून अधिक मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. ही दुर्घटना गुरुवारी मध्यरात्री उशिरा घडली.

बैलहोंगलहून बेलवडीकडे जाणारी कार भरधाव वेगाने येत असताना रस्ता ओलांडणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावरून गेली. या भीषण अपघातात केंगानूर येथील चंद्रप्पा हित्तलमणी आणि दोडवाड येथील बीरप्पा यांच्या मालकीच्या मेंढ्यांचे मोठे नुकसान झाले.

अपघातानंतर कारचालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला. गर्भवती मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने आणि काहींची पोटे फाटून कोकरे बाहेर पडल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.


Share News