Share News

हिंडलगा गणपतीजवळ विजेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू; दीड लाखांचे नुकसान

बेळगाव : हिंडलगा येथील गणपती मंदिराजवळ शनिवारी रात्री दुर्दैवी घटना घडली. विजेचा धक्का लागल्याने एका म्हशीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत पशुपालकाचे सुमारे ₹1.50 लाखांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण भातकांडे, रा. ओंकार नगर, 2nd Cross, डी.डी. रोड, हिंडलगा यांच्या मालकीची म्हैस विजेच्या प्रवाहाच्या संपर्कात आल्याने दगावली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेमुळे पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित विभागाने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.


Share News