कर्नाटक मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार; २० नव्या मंत्र्यांच्या नावांना काँग्रेस हायकमांडची मंजुरी
बेंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीने (AICC) २० नव्या मंत्र्यांच्या नावांना मंजुरी दिली असून, संबंधित यादी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.
मंत्रिमंडळात समाविष्ट होणाऱ्या २० नव्या मंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
1. पी. एम. नरेंद्रस्वामी
2. शिवराज संगप्पा तंगडगी
3. रुद्रप्पा लमाणी
4. के. एस. बसवंतप्पा
5. बी. नागेंद्र
6. टी. रघूमूर्ती
7. बी. झेड. झमीर अहमद खान
8. रिझवान अर्शद
9. संतोष लाड
10. मधु बंगारप्पा
11. पुट्टरंगशेट्टी
12. मंकाळ वैद्य
13. डॉ. अजय सिंह
14. एन. चालुवराया स्वामी
15. के. एम. शिवलिंगे गौडा
16. एच. सी. बालकृष्ण
17. गायत्री शांतेगौडा
18. बसवराज रायारेड्डी
19. विजयानंद काशप्पनवर
20. लक्ष्मण सवदी
याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विधानपरिषदेचे सभापती आणि उपसभापती पदांसाठीही काँग्रेस हायकमांडने मंजुरी दिली आहे.
आज दुपारी ४ वाजता बेंगळुरूमध्ये नूतन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असून, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्यातील प्रमुख पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

