बेळगाव शहर पोलिसांच्या ताफ्यात फॉरेन्सिक व्हॅनसह तीन नवीन बोलेरो वाहनांचा समावेश
बेळगाव : बेळगाव शहर पोलिसांच्या तपास यंत्रणा आणि गस्ती व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी पोलिस विभागाला अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन तसेच तीन नवीन बोलेरो वाहने प्राप्त झाली आहेत.
अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेली ही फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळीच प्राथमिक वैज्ञानिक तपास, पुरावे संकलन व विश्लेषण करण्यास मदत करणार असून, त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासाची गुणवत्ता आणि वेग दोन्ही वाढण्यास हातभार लागणार आहे.
तसेच नव्याने दाखल झालेल्या तीन बोलेरो वाहनांमुळे शहरातील पोलिस गस्त अधिक गतिमान होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे अधिक प्रभावीपणे शक्य होणार आहे.
या नव्या वाहनांमुळे बेळगाव शहर पोलिस दलाची कार्यक्षमता, तपासाची गुणवत्ता आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठीची प्रतिसाद क्षमता आणखी मजबूत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

