उद्या बेळगावच्या राजाचे भव्य आगमन; धर्मवीर संभाजी चौकात लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित
सायंकाळी ठीक ५ वाजता आगमन सोहळा; प्रथम दर्शनाचा लाभ घेण्याचे मंडळाचे आवाहन
*बेळगाव :* बेळगावकरांसह गणेशभक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो क्षण अखेर उद्या, *शुक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी* साकार होणार आहे. ‘बेळगावचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचा भव्य आगमन सोहळा उद्या सायंकाळी ठीक ५ वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या आगमन सोहळ्यासाठी बेळगाव शहरासह परिसरातील लाखो गणेशभक्त उपस्थित राहण्याची अपेक्षा असून, गणरायाच्या प्रथम दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचे निनाद आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.
बेळगावचा राजा’च्या आगमन सोहळ्याचा हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी तसेच गणरायाचे प्रथम दर्शन घेण्यासाठी सर्व गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन सुनील जाधव यांनी केले आहे.
गणेशभक्तांनी शिस्त व सुरक्षिततेचे पालन करून आगमन सोहळ्याचा आनंद घ्यावा आणि गणरायाच्या प्रथम दर्शनाचा लाभ घ्यावा असेही मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

