Share News

गणेश मंडळांसाठी ‘गणराया पुरस्कार’; बेळगाव पोलिसांकडून यंदापासून उपक्रम

बेळगाव : यंदाच्या गणेशोत्सवापासून बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उत्कृष्ट गणेश मंडळांना ‘ए गणराया पुरस्कार’ देण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशांचे तसेच पोलीस विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तीन उत्कृष्ट गणेश मंडळांची या पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे.

या पुरस्कारासाठी विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी, गणेश महामंडळाचे प्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्थांचे (NGO) प्रतिनिधी यांचा समावेश असलेली समिती विजेत्या मंडळांची निवड करणार आहे.

शांततापूर्ण आणि नियमबद्ध गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार दिला जाणार आहे.


Share News