उचगाव जिल्हा पंचायत मतदारसंघातून भाजपकडून डॉ. उमेश शिदोंळकर इच्छुक
बेळगाव : आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उचगाव जिल्हा पंचायत मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार म्हणून डॉ. उमेश लक्ष्मणराव शिदोंळकर यांनी तयारी दर्शवली आहे.
डॉ. उमेश शिदोंळकर हे सध्या भाजपा बेळगाव ग्रामीण जिल्हा ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पक्ष संघटनेतील पदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी उचगाव जिल्हा पंचायत मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे. भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होणे अद्याप बाकी आहे.

