Share News

बेळगाव ब्रेकिंग|मतदारांना पैसे वाटताना मंत्री हेब्बाळकर यांच्या समर्थकांना भाजप कार्यकर्त्यांनी पकडले रंगेहात

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्व्भूमीवर एक धक्कादायक घटना उघडकीस आहे.मतदारांना पैसे वाटताना भाजप कार्यकर्तांनी काँग्रेस समर्थकांना रांगेहात पकडले आहे.

बेळगाव गोकाक येथील अंकलगी गावात ही घटना उघडकीस आहे.
काँग्रेसच्या उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यानावाने पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे .पैसे वाटपासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे समर्थक घरोघरी जाऊन नागरिकांना पैसे वाटत आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील अंकलगी गावात ही घटना घडली आहे .यावेळी मिळेली माहिती अशी की
पाच जणांना घरोघरी एक हजार रुपये वाटले जात होते.भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी येताचमंत्री हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

भाजप कार्यकर्त्यांनी या पाच जणांचा चित्रपटात दाखवतात त्या स्टाईल ने पाठलाग केला
यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मुलगा मृणाल हिच्यासाठी पैसे वाटण्यासाठी आलो आहोत असे समर्थकानी सांगितले.

भद्रावती येथील दोन आणि हर्षा शुगर्सचे दोन अशा समर्थकांना भाजपचे कार्यकर्ते यांनी हेब्बाळकर यांच्या समर्थकांना पकडले
यावेळी गोकाकचे काँग्रेसचे महांतेश काडादी यांनाही कार्यकर्त्यांनी पकडले यावेळी मतदारांना वाटण्यासाठी आणलेले लाखो रुपये पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या स्वाधीन भाजप कार्यकर्त्यांनी केले .ही घटना अंकलगी पोलीस ठाण्यात घडली आहे


Share News