बेळगावहुन अयोध्येकरिता धावली स्पेशल ट्रेन
प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी जाण्याची प्रत्येक रामभक्तांची इच्छा आहे. देशातील विविध भागांतून प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी भाविक वेगवेगळ्या मार्गाने निघत आहेत. रामभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी बेळगावहून अयोध्येसाठी रेल्वे सुरु व्हावी अशी मागणी होत होती.त्यामुळे बेळगावहून आयोध्येसाठी आज स्पेशल आस्था ट्रेन सेवेचा शुभारंभ करण्यात आला. जवळपास बेळगाव मधून 1333 भाविक आयोध्येतील प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार आहेत. ट्रेनमध्ये एकूण 5000 प्रवासी एकाच वेळी करण्याची क्षमता आहे.या स्पेशल ट्रेन ला आज हिरवा झेंडा दाखविण्यात आला आणि बेळगाव ते अयोध्या रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला.
#Belgaumtoayodhyatrain बेळगावहून आयोध्येसाठी रेल्वे सुरू व्हावी अशी मागणी होती, ही मागणी लक्षात घेऊन राम भक्तांना प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्याकरिता भारतीय रेल्वेने स्पेशल ट्रेन सुरू करण्याचे निर्णय घेतला. त्यामुळे आता बेळगावकरांना श्रीरामांचे दर्शन घेण्याकरिता सोयीस्कर झाले आहे. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भारतीय रेल्वेने स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे १६ फेब्रुवारी हुक्केरी मठाचे स्वामीजी यांच्या हस्ते रेल सेवेचा शुभारंभ करण्यात आला . यावेळी बजरंग दलचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि त्यानंतर सकाळी 10.30 वाजता बेळगावातील रेल्वे स्टेशनमधून अयोध्येसाठी ट्रेन रवाना झाली.