कारागृहात सावरकरांचा स्मृतिदिन साजरा करण्यास परवानगी न दिल्याने कार्यकर्त्यांचे आंदोलन
कारागृहाच्या बाहेर ठाण मांडून निषेध
स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांच्या स्मृतिदिन दरवर्षी हिंडलगा जेल मध्ये करण्यात येतो.मात्र यावर्षी वीर सावरकर यांचा स्मृतिदिन जेलमध्ये साजरा करण्याची परवानगी देण्यात न आल्याने श्रीराम सेना हिंदुस्तान च्या कार्यकर्त्यांनी बेळगाव येथील हिंडलगा कारागृहासमोर ठाण मांडून आंदोलन केले. आणि जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी श्री राम सेना हिंदुस्तानचे पदाधिकाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही #हिंडलगाजेल मध्ये स्मृतिदिन साजरा करण्याकरिता गेले असता अधिकाऱ्यांनी सरकार बदलले आहे त्यामुळे आपण या ठिकाणी वीर सावरकर यांचा स्मृतिदिन साजरा करू शकत नाही असे सांगितले. त्यामुळे हिंडलगा जेलच्या बाहेर कार्यकर्त्यांनी ठाण मांडून आंदोलन केले त्यानंतर वीर सावरकरांचा फोटो ठेवून पूजन केले त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.