Share News

ज्योतीर्लिंग देवस्थानात महाशिवरात्री उत्साहात

महाशिवरात्रीनिमित्त येथील नार्वेकर गल्ली मधील ज्योतिर्लिंग देवस्थानात रात्री एक वाजता देवाला लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. तसेच अहोरात्र देवाचा जागर करून केदार कवच आणि नामस्मरण करण्यात आले. तसेच पहाटे चार वाजता काकड आरती करण्यात आली.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवरात्रीनिमित्त मंदिरात धार्मिक विधी करण्यात आले

यावेळी पौरोहित्य रघु जोशी यांनी केले.. तसेच देवाला 151 लिटर दुग्धाभिषेक करून आरती करण्यात आली. त्यानंतर बारा वाजता देवाला खिचडीचा आणि फळांचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर मंदिरात येणाऱ्या भाविकांना तीर्थ प्रसादाचे वाटप करण्यात आले.


Share News